राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असून दुसरीकडे कोरोना लसही आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. दरम्यान पुन्हा शाळा आणि शैक्षणिक संस्था सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण माहिती दिली. (school Classes start from January 27 ) राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.
शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची लस येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा धोका कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्यातील 5 वी ते 8 वीपर्यंत शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं सांगितलं असलं तरी मुंबई पालिकेकडून शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.