पाटोदा

अंमळनेरमध्ये अनोळखी तरुणाचा वार करून खुन, अँसिड टाकुन पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा जाळला


पिंपळ्वंडी दि.(प्रतिनिधी)पाटोदा तालूक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत गंभिर स्वरुपाचे गुन्हे वाढत असुन बुधवार दिनांक ३० रोजी दुपारी तीनच्या दरम्यान एक  पुरुष जातीचे प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत डोंगरकिन्ही येथे नुकताच गोळीबार झाला होता, सदरील प्रकरण ताजे असतानाच आज दूपारी पेट्रोलपंपासमोर अरुण पोकळे यांच्या शेतातील बांधावर झाडा-झूडपात एक पुरूष जातीचे सडलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले आहे. दुपारी तीनच्या सुमारास गणेश अनिल पोकळे या मुलाने सदरील प्रेत पाहिल्यानंतर त्याने ही घटना सुरेश पोकळे यांना सांगितली त्यानंतर सुरेश पोकळे यांनी तात्काळ अंमळनेर पोलीस ठाण्यात संपर्क करून घटना कळवली. पोलिसांनी तात्काळ आपल्या सर्व टिमसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदरील प्रेत हे तीन दिवसापूर्वीचे असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. सदरील पुरुषाचा खून करून त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी चेहऱ्यावर केमिकल टाकुन चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. साधारणपणे सदरील पुरुष हा ४० ते ४५ वयाच्या दरम्यानचा दिसून येत आहे. डोक्यावर, गळ्यावर गंभिरस्वरुपाचे वार दिसून येत असल्याने खुन करुन चेहरा जाळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदरील ईसमाच्या अंगावर पिवळसर रंगाचा फुल भायाचा शर्ट, आणि काळसर व पांढऱ्या रंगाची पँन्ट आहे. तसेच जबड्याच्या वरील भागातील दातांना तार ( पिन ) लावण्यात आलेली आहे. पायात पँरागाँन कंपनीची काळी चप्पल, गळयात गमजा, हातात काळा दोरा असे वर्णन आढळून आले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विजय लगारे, स.पो.नि.श्यामकुमार डोंगरे, तसेच विषेश पथक बीड व आष्टीचे ढवळे, सोनवणे, देवकते, शेळके आदिंनी भेटी देऊन अज्ञात ईसमाचा शोध लावण्यासाठी कशोशीने प्रयत्न सुरु केले आहेत.  आसपासच्या पोलीस ठाण्यात एखादी मिसींग दाखल आहे का?याचीही माहिती घेतली जात आहे. सदरील घटना दोन-तीन दिवसापूर्वी घडलेली असल्यामुळे प्रेताची दुर्गंधी येत होती. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी कागदे, बडे, तसेच गाडे, पवार आदिंनी शवविच्छेदन केले. फौजदार अमन सिरसाट, देविदास आवारे, आर्सुळ,  आघाव, खोले, गुंडाळे, भालसिंग, घोशीर आदि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खुनी पुरुष नेमका कोण असावा यासाठी अंमळनेर पोलीस बारकाईने तपास करीत असून लवकरच या खुनाचा उलगाडा होईल अशा विश्वास अंमळनेर पोलांसांनी व्यक्त केला आहे.सदरील खुन अनैतिक संबाधातून झाला की, शेतीच्या वादातुन कि, आणखी ईतर कारणामुळे झाला याचा उलगाडा प्रेताची ओळख पटल्यावरच होणार आहे. तत्पूर्वी मात्र वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. एकंदरीत अंमळनेर येथे सापडलेल्या प्रेतामुळे खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!