परळी

आयपीएलवर सट्टा लावणारे पाच जण जेरबंद, 1 लाख ७६ हजाराचा माल केला जप्त

facebook sharing button
twitter sharing button
email sharing button
messenger sharing button


परळी, 28 सप्टेंबर – सध्या आयपीएल टुर्नामेंट सुरू असून त्यावर काही जण सट्टा लावतात. खंडोबा मंदिर परिसरामध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर रात्री अकरा वाजता त्या ठिकाणी धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. या लोकांकडून १ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 
   गेल्या काही दिवसांपासून आयपीएल टुर्नामेंट सुरू आहे. आयपीएलच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. खंडोबा मंदिर परिसराच्या बाजुला आयपीएलवर सट्टा लावला जात असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. या वेळी नंदीग्राम शालीग्राम पवार याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. या जुगार्‍यांकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई बाळासाहेब पवार, चांद मेंडके, भताने, ऐटवाड, सानप, दुर्गे यांनी केली. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!