परळी

डॉ. सुदाम मुंडेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी

परळी, दि. 15 : येथील गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ.सुदाम मुंडे यांना वैद्यकीय गर्भपात कायदा 2,3,4 कलमान्वये तसेच सरकारी कामात अडथळा,बोगस प्रक्टीस, साथरोग विविध कलमाखाली परळी पोलीसांनी गुन्हे दाखल केले होते. दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी रामनगर परळी वैजनाथ येथे शेतात दवाखाना चालू केल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलीस व वैद्यकीय अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी धाड टाकली व आरोपी सुदाम मुंडे यांना पोलीसांनी अटक केली.पोलीस कस्टडी घेऊन परत रिमांड यादी अधिक चार पाच नविन भारतीय दंड विधान प्रमाणे कलमे वाढवून मंगळवारी परळी न्यायालयात परत चौकशीसाठी पोलीस कस्टडीची मागणी सरकार पक्षाने केली होती. परंतु प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश श्री येलमाने यांनी आरोपी डॉ.सुदाम मुंडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी तर्फे अ‍ॅड. दत्तात्रय आंधळे यांनी युक्तिवाद केला.त्यांना सहकार्य अ‍ॅड.एस.व्हि.केंद्रे यांनी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!