परळी

महेश सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; बॅकींग क्षेत्रात प्रचंड खळबळ


परळी वैजनाथ दि २५ ( लोकाशा न्युज ):- सहकार क्षेत्रात अल्पावधीतच नावारूपास आलेल्या येथील महेश अर्बन को आॅप सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र अरुण सोनार यांनी कन्हेरवाडी घाटात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत परळी ग्रामीण पोलीसात नोंद करण्यात आली असून या घटनेने बँकिंग सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी येथील महेश अर्बन को-ऑपरेटिव सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले देवेंद्र अरुण सोनार वय ५२ हे दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी बँकेत कामावर जातो म्हणून घरातून निघून गेले ते परत आलेच नाहीत. दरम्यान सोनार यांच्या पत्नीने त्यांची वाट पाहून ते न आल्याने दिनांक २४ सप्टेंबर २०२० रोजी त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र आज सकाळी देवेंद्र सोनार यांनी परळी – अंबाजोगाई रोडवरील शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील कन्हेरवाडी घाटात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्रथम दर्शनी नागरिकास दिसले. त्यांनी ताबडतोब याबाबतची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले. पोलिसांनी लटकत असलेल्या प्रेता बाबतची शहानिशा केली असता झाडास लटकत असलेले प्रेत हे महेश अर्बन सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सोनार यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी देवेंद्र सोनार प्रेत ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करून परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. दरम्यान देवेंद्र सोनार यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आली नसून या घटनेने बँकिंग सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!