नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मुंढे यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द तुकाराम मुंढे यांनी स्वतःहून ट्विट करून कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मंगळवार 25 रोजी सकाळी दिली आहे. मात्र त्यांना अन्य कोणतीही लक्षण नाही. तरीही जे कोणी तुकाराम मुंढे यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतः पुढे येऊन कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन मुंढे यांनी केले आहे.
तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली. मला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. मागील 14 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.