खान्देश

राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणाले, ‘माझ्या प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच’

BJP Leader Eknath Khadse reaction on Possibility of enter in NCP

जळगाव : भाजप नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून ते आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, काल जळगावात असताना खडसेंनी ‘राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स’ असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. ‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत’, असेही ते यावेळी म्हणाले.

शुक्रवारी दुपारी एकनाथ खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आलेले होते. आपल्या निवासस्थानी असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केले.

error: Content is protected !!