क्राईम पाटोदा

लग्नासाठी केली बळजबरी, अल्पवयीन मुलीने संपवले जीवन

चार दिवसांनंतर अंमळनेर पोलिसात गुन्हा नोंद


पाटोदा  : लोकाशा  न्यूज 
पाटोदा तालुक्यातील कारेगाव अंतर्गत कठाळवाडी येथिल अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी दमबाजी करीत आत्महत्येस प्रवृत्त केले यासंदर्भात चार दिवसांनंतर अंमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.    कठाळवाडी येथिल अकरावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्या गौत्तम कठाळे १७ या अल्पवयीन मुलीने दि ८ रोजी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात दि ९ रोजी तिचे निधन झाले. तेव्हापासून मुलीच्या आई व वडिलांनी संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानुसार अकस्मात गुन्हा नोंद केला होता. मात्र आई वडिलांनी न्यायासाठी पोलिस ठाण्यातच ठाण मांडले. अंमळनेर पोलिसांनी कठाळवाडी येथिल घटनास्थळाचा पंचनामा करून तसेच मोबाईल लोकेशन व कॉल डिटेल तपासले. चार दिवसांनंतर अंमळनेर पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तीन तरुणांना विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. मुलीच्या आईने फिर्यादित म्हटले आहे की, शिरुर तालुक्यातील कान्होबाची वाडी येथिल तरुण हा विद्या हिस लग्नासाठी दबाव टाकत होते, व दमबाजी करीत होते याचा त्रास सहन न झाल्याने विद्याने आत्महत्या केली आहे. या फिर्यादीवरून आरोपी विरोधात चार दिवसांनंतर गुन्हा भादंवी ३०५,३५४ बी, ३४/१२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारे हे तिचे नातेवाईक तरुण आहेत. विद्या हि हुशार मुलगी होती. तिला बारावीच्या नंतरही शिकायचे होते. तिचे वडिल हे रेल्वेच्या कामावर धारुर तालुक्यात असतात तर आई शेतात असते. हे आरोपी सततच तिला मानसिक त्रास देऊन लग्नासाठी दमबाजी करीत होते. याची वाच्यता मुलीने आईजवळ केली होती. मात्र या तरुणांनी मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप मुलीचे मामा, आई वडिल यांनी केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!