बीड, दि.13 : एका 20 वर्षीय विवाहितेस एकटीला पाहून गावालगतच्या तलावाजवळ एका साडे सोळा वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी भुरेवाडी (ता.पाटोदा) येथे घडली होती. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी भुरेवाडी येथे एका विवाहितेस गावालगतच्या तलावाजवळ एकटीला पाहून एका अल्पवयीन आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरुन पाटोदा पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात बुधवारी रात्री उशिरा गु.र.नं.172/2020 नुसार कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सपोनि.कोळेकर हे करीत आहेत. दरम्यान, आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.