केज, गुरूवारी मध्यरात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, ज्वारी,आंबे,टरबूज, खरबूज, डाळिंब, फळबाग व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आज आ.नमिता मुदंडा यांनी सारूळ, जोला, पिंपळगाव, विडा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व राज्याचे कृषी मंञी मा.ना.श्री.दादासाहेबजी भुसे यांना फोन करून नुकसानीचे तत्काळ ऑफ लाईन पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी विनंती केली.
याप्रसंगी झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करताना सोबत श्री.अक्षय मुंदडा, केज चे तहसीलदार श्री.मेंडके साहेब, तालुका कृषी अधिकरी श्री.भगत साहेब,
विडा गटाचे जि.प.सदस्य श्री.विजयकांत मुंडे, श्री.रमाकांत बापु मुंडे, केज भाजपा चे तालुकाध्यक्ष श्री.भगवान केदार, श्री.सुनिल आबा गलांडे, श्री.मुरलीधर ढाकणे, श्री.सुरज पटाईत, श्री.सुनिल घोळवे, श्री.मच्छिंद्र जोगदंड, श्री.शिवाजी पाटील, श्री.राहुल गदळे, श्री.सुदाम पाटील, श्री.काकासाहेब पाळवदे, श्री.धनराज पवार, श्री.केशव घोळवे, श्री.संभाजी ढाकणे, श्री.शंकर ढाकणे, पञकार दत्ता ढाकणे, श्री.आशोक गायकवाड, श्री.सुरेश घोळवे, श्री.रवी नांदे, श्री.उध्दव देशमुख, डॉ. श्री.ढाकणे साहेब, श्री.सदाशिव वाघमारे, बाबा शेख, श्री.आशोक गायकवाड यांच्यासह संबधित प्रशासकीय अधिकारी श्री.गिरधावर साहेब, तलाठी, कृषी सहायक यावेळी उपस्थित होते.