बीड

आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाने केल्या प्रभारींच्या नियुक्त्या,प्रभारीपदी आ.लक्ष्मण पवार,डॉ.स्वरुपसिंह हजारी, ॲड.सर्जेराव तांदळे,राजाभाऊ मुंडे

बीड,

बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा,शिरूर, वडवणी, व केज या नगरपंचायत निवडणूका बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी पक्ष पातळीवर मोर्चे बांधणी सूरू केली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

जानेवारी २०२१ दरम्यान जिल्ह्यातील साधारण पाच नगर पंचायतीच्या निवडणूका घोषित होणार आहेत.महाराष्ट्र भाजप प्रदेशच्या सूचनेवरून या निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी भाजप राष्ट्रीय सचिव तथा लोकनेत्या पंकजाताईं गोपीनाथराव मुंडे व प्रदेश उपाध्यक्षा तथा खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या रणनीती नुसार प्रत्येक नगरपंचायती करिता अनुभवी निवडणूक प्रभारीची नियुक्ती करण्यात आली आहे.केज-नगरपंचायत निवडणूक प्रभारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, वडवणी नगरपंचायत निवडणूक प्रभारी पदी भाजप नेते आ. लक्ष्मण आण्णा पवार, पाटोदा-नगरपंचायत निवडणूक प्रभारी डॉ. हजारी आष्टी-नगरपंचायत निवडणूक प्रभारी अॅड. सर्जेरावतात्या तांदळे, शिरूर-नगरपंचायत निवडणूक प्रभारी भाजप जेष्ठ नेते राजाभाऊ मुंडे तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त निवडणूक प्रभारींच्या माध्यमातून निवडणूक होवू घातलेल्या नगरपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रातील मंडल अध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, भाजपा पक्ष हितैषी प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी चर्चा व संवाद साधून प्रभावी ईच्छुक उमेदवारांची यादी तयार करून इच्छुक उमेदवारांचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश कडे पाठवला जाईल.सर्वानुमते योग्य प्रभावी उमेदवारांची निवड करून ताकदीने निवडणूक लढवण्याचा संकल्प पक्षानं स्विकारला आहे.

राज्यभरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची अभद्र युती असणा-या महाविकास आघाडीच्या सरकारने एक वर्षं पूर्ण केले आहे. या वर्षभरात या तिघाडी सरकारने जनतेच्या हितासाठी नवीन कोणतही काम केलेले नाही. कोरोना महामारीची ढाल पुढे करून दिवस मोजण्याचे रिकामे काम केले. कोरोना महामारीत राज्य सरकारने जनतेला दिलासा दिला नाही. प्रत्येक वेळी केंद्र सरकारच्या मदतीची प्रतिक्षा केली.सरकार म्हणून स्वतः कोणत्याही प्रकारचे कर्तव्य पार पाडले नाही. वीज बील सवलती ची घोषणा केली.परंतु प्रत्यक्षात दमडीची ही मदत वीज ग्राहकांना न करता जनतेची फसवणूक शेवटी सरकारने केली. दूध दरवाढ मागणीसाठी शेतकरी व दूध व्यवसायीक रस्त्यावर उतरले. त्यांच्या मागणीला ही सरकारने दाद दिली नाही. राज्यातील शेतकरी, वीज ग्राहक, दुग्धव्यवसायीक, कामगार, अशा कोरोना लॉकडावून काळात त्रस्त जनतेला आधार न देण्याचं पाप या सरकारने केलं. महविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे. हा आक्रोश आणि संताप भविष्यातील प्रत्येक निवडणुकीत ग्रामीण जनता मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करणार आहे. यामुळे आगामी निवडणूकीत निश्चितच भारतीय जनता पार्टीला यश मिळेल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!