बीड केज

बायकोचा अर्धनग्न फोटो नवर्‍याचे स्टेट्स

केज दि.२६ : व्हाट्सअप (Whatsapp) स्टेटसवर पत्नीचे अर्धनग्न फोटो ठेवणे व पिडितेच्या चुलत्याला व्हाट्सअप वर तेच फोटो पाठवून सोशल मेडियातून (Social Media) विनयभंग केल्याप्रकरणी केज (Kaij) पोलिसात (Police) पती विरुध्द गुन्हा नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.पती पत्नी ही संसाराची दोन चाके. भारतीय संस्कृतीत पती पत्नीसाठी सर्व सुख दुखाचा साथिदार असतो. पत्नीची अब्रु ही पतीसाठी जीवापाड असते. मात्र केजमध्ये पतीनेच पत्नीची अब्रु चव्हाट्यावर आणल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत सविस्तर वृत्त असे की केज (Kaij) तालुक्यातील एका तरुणीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एका तरुणांसोबत काही काळापुर्वी लग्न झाले. दि.२४ रोजी सदरील पतीने पत्नीचे अर्धनग्न लज्जास्पद फोटो पिडितेच्या चुलत्याला व्हाट्सअप (Whatsapp) वर पाठवले. दि.२५ रोजी हेच अर्धनग्न फोटो स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवले. यामुळे पिडितेला धक्का बसला. सोशल माध्यमात (Social Media) लज्जास्पद फोटो व्हायरल केल्यामुळे विवाहितेची बदनामी झाली. याप्रकरणी पिडितेने थेट केज पोलिस ठाणे गाठत पती विरुध्द फिर्याद दिली. याप्रकरणी केज पोलिस (Police) ठाण्यात आरोपी पती विरुध्द भादवि ३५४(क) सह माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदिप त्रिभुवन हे करत आहेत. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!