मराठवाडा

कांदा घेवून जाणार्‍या टेम्पोला अपघात, बीडचे तीन ठार, मयतात चालकासह दोन शेतकर्‍यांचा समावेश


नेकनूर, – कांदा घेऊन निघालेल्या टेम्पोचे टायर फुटल्याने टेम्पो डिवाडरवर जोरात धडकला. या अपघातात चालकासह दोन शेतकरी ठार झाले तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना पहाटे दोन वाजता तुळजापूरच्या घाटात घडली. या दुर्दैवी घटनेने नेकनूरसह निवडूंगवाडीवर शोककळा पसरली आहे.

नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या निवडूंगवाडी गोवरवाडी येथील तीन शेतकर्‍यांनी आपला कांदा एकत्रित करून तो सोलापूरच्या बाजाराला टेम्पो (क्र. एम.एच. १६ ए.ई. ७७०४) यामध्ये घेऊन जात होते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास टेम्पोचे टायर फुटल्याने टेम्पो तुळजापूरच्या घाटात डिवायडरवर जोरात धडकला. यात चालक शेख सज्जाद सकलेन (वय ४०, रा. नेकनूर) देवराव तुळशीराम शिंदे (वय ५५ रा. गोवरवाडी नेकनूर), मोहन भगवान मुंडे (वय ४५, रा. निवडूंगवाडी)हे तिघे ठार झाले तर भागवत शिवाजी मुंडे (वय ४०, रा. निवडूंगवाडी) हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उस्मानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती नेकनूर आणि निवडूंगवाडी येथील नागरिकांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या दुर्दैवी घटनेने नेकनूर, निवडूंगवाडी, गोवरवाडी येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान मयत चालक नेकनूर येथील असून आपल्या मनमिळावू स्वाभाने ते सर्वत्र परिचीत होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे नेकनूर येथील व्यापार्‍यांनी बंद ठेवून दुख व्यक्त केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!