मराठवाडा

आयएएस शिवानंद टाकसाळे आता परभणी झेडपीचे सीईओ


बीड, 8 डिसेंबर : राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी बीडचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांची परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवानंद टाकसाळे यांनी नेहमीच आपल्या कामातून दबदबा निर्माण केलेले आहे, यामुळेच राज्यातील अनेक गोर गरिबांना न्याय मिळालेला आहे, या निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातुन टाकसाळे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!