मराठवाडा

“लेडी सिंगम”चे कार्य ठरतेय पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणारे! राज्याच्या गृहमंत्र्यांकडून मिळाली कौतुकाची थाप


औरंगाबाद, दि. 8 डिसेंबर : औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे प्रत्येक काम खरोखरच आदर्श घेण्यासारखे आहे, त्यांच्या कामामुळे आज औरंगाबाद ग्रामीणमधील अनेक गोर गरिबांना न्याय मिळत आहे, याबरोबरच जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या आहेत, आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम ही त्या सातत्याने करत आहेत, नुकतेच बंदोबस्ताच्या ठिकाणी जेवण करत असलेल्या अंमलदारांच्या डब्यातील पोळी, भाजीचा आस्वाद त्यांनी घेतला, कोणताही दुजाभाव मनात न ठेवता आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पाटील यांनी केलेली ही कृती कौतुकास्पद असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे, गृहमंत्र्यांबरोबरच या लेडी सिंगमच्या कामाचे संपूर्ण पोलीस दलातून कौतुक होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!