मराठवाडा

ही तर पदवीधरांनी दिलेल्या कामाची पावती – आ. सतीश चव्हाणऔरंगाबाद, 4 : यावेळी वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा आधार घेत विरोधी पक्षाने आपलाच विजय होणार अशी हवा करण्याचा प्रयत्न केला. परंतु निकालांती त्यांचा फुगा फुटला. सतीश चव्हाण यांनी बारा वर्षात काय केले? असा प्रश्न विचारणार्‍यांना पदवीधर मतदारांनी मतपेटीतून जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधरांच्या भक्कम साथीने हा विक्रमी विजय मला प्राप्त करता आला. प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून लढलेल्या कार्यकर्त्याच्या ऐकीने ऐतिहासिक विजय प्राप्त होतो, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. तसेच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक यासह विविध संघटनांनी दिलेला जाहीर पाठींबा व अमूल्य साथ देखील तेवढीच महत्वाची होती. मराठवाड्यातील माझ्या तमाम सुज्ञ पदवीधर बंधू आणि भगिनींनी मला बारा वर्षांत केलेल्या कामाची पावती देत माझ्यावर पुन्हा एकदा जो अमीट विश्वास दाखवला आहे. त्यांच्या विश्वासाला मी कदापी तडा जाऊ देणार नाही, असे
.सतीश चव्हाण याांनी म्हटलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!