मराठवाडा

पुन्हा एखादा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर आ. सतीश चव्हाण यांची नियुक्ती



औरंगाबाद – मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सलग तिसर्‍यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियमन, 1983 च्या कलम 30 (क) (1) (तेरा) अन्वये, मा.सभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील एका रिक्त जागी आ.सतीश चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाचे अवर सचिव उमेश शिंदे यांनी आज (दि.23) आमदार सतीश चव्हाण यांना नियुक्ती पत्र दिले. यापूर्वी देखील आमदार सतीश चव्हाण यांची सलग दोन वेळा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. या कार्यकाळात आमदार सतीश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठाच्या संशोधन व भौतिक सुविधांसाठी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला. तसेच लातूर येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत मंजूर करून घेतला. कृषी विद्यापीठाअंतर्गत विविध प्रलंबित प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी या कार्यकाळात मार्गी लावले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!