देश विदेश

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी ‘एलटीसी’ ऐवजी रोख रक्कम, तर सण-उत्सवासाठी बिनव्याजी 10 हजार रुपये विशेष अ‍ॅडव्हान्स


नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : अर्थव्यवस्थेमधील मागणी वाढवण्यासाठी काही प्रस्तावांवर काम केले जात आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक मुद्द्यांवरील पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. यामध्ये भांडवली खर्चाला प्रोत्साहन आणि राज्यांमार्फत भांडवली खर्चाला मदत असे दोन भाग आहेत.
गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आत्मनिर्भर पॅकेजमध्ये तरतूद करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजूमध्ये सुधारणा झाली आहे. परंतु मागणी वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं वित्तमंत्र्यांनी सांगितले. मागणी वाढवण्याचे प्रयत्न आर्थिक शिस्त ध्यानात ठेवून घेतले जातील काही ठिकाणी खर्च वाढवावा लागेल, त्यातील काही बाजू या जीडीपी वाढवण्याशी संबंधित आहेत. मागणीला चालना देण्यासाठी एलटीसी कॅश व्हाउचर स्कीम आणि स्पेशल फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स स्कीम हे दोन प्रस्ताव आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!