देश विदेश

भारत-चीन सीमा संघर्ष; आज लष्कराची बैठक

दिल्ली, दि. १२ (लोकाशा न्यूज) : गलवान खोऱ्यातील रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारत-चीन यांच्यातील सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. जूनपासून दोन्ही देशातील सीमेवर तणावपूर्ण स्थिती असून, त्यावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी लष्कराच्या बैठक सुरू आहेत. या बैठकीची सातवी फेरी आज होत असून, या बैठकीला दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होणार असून, चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी पहिल्यांदाच हजर राहणार आहेत.
गलवाननंतर पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, दक्ष भारतीय लष्करामुळे चीनचा डाव उधळून लावण्यात आला. मात्र, त्यानंतरही दोन्ही बाजूंकडील सैन्य सामने असून, सध्या तणावपूर्ण स्थिती आहे.
सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरीय बैठक सुरू आहे. आतापर्यंत बैठकीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. चर्चेची सातवी फेरी आज (१२ ऑक्टोबर) होत असून, ही बैठक भारतीय हद्दीत होणार आहे. चुशूल-मोल्डो बॉर्डर पॉईंटवर ही बैठक होणार आहेत. या बैठकीत पहिल्यांदाच चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे उच्च पदस्थ अधिकारी सहभागी होणार आहेत.
लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ बैठकीला हजर राहणार आहे. सिंग यांनी कॉर्प्स कमांडर पदाची सूत्रे स्वीकारली त्याला १४ ऑक्टोबर रोजी एक वर्ष होत आहे. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये २१ सप्टेंबर लष्करी बैठक झाली होती. या बैठकीला भारताकडून एक उच्च पदस्थ अधिकारीही उपस्थित होते. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांची मास्कोमध्ये भेट झाली होती. या भेटीवेळी दोन्ही देशांमध्ये पाच मुद्यांवर सहमती झाली होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!