देश विदेश

जम्मूतल्या दादूरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु

जम्मू काश्मीर, दि. १० (लोकाशा न्यूज) : जम्मूतल्या दादूरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दादूरा हा भाग पुलवामात येतो. या भागात आता शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. आज सकाळीच कुलगाम भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ काही वेळापूर्वीच दादूरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं असून, दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले होते.  
आज सकाळी कुलागामच्या चिंगम भागात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर परिसरात वेढा देऊन शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दरम्यान आज दुपारच्या सुमारास पुलवामा भागातील दादूरा या ठिकाणीही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यांनी या ठिकाणी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.  

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!