देश विदेश

भारीच! फक्त फुंकर मारा अन् एका मिनिटात कोरोना झाला की नाही हे ओळखा; तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाय केले जात आहेत. चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्याही 69 लाखांवर गेली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. .
याच दरम्यान भारत आणि इस्रायल संयुक्तपणे अवघ्या काही क्षणांत कोरोना व्हायरसच्या चाचणीचं एक गेमचेंजर तंत्रज्ञान तयार करत आहे. रॅपिड टेस्टिंग रिसर्च आता शेवटच्या टप्प्यात असून येत्या काही दिवसांतच हे किट तयार होणार आहे.रॅपिड टेस्टिंग किटच्या मदतीने अवघ्या एका मिनिटांहूनही कमी वेळेत कोरोनाचा रिपोर्ट मिळणार आहे. नळीमध्ये फुंकर मारून कोरोना झाला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे.भारतातीलइस्रायलचेराजदूत रॉन माल्का यानी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. येणार्‍या काळात भारत आणि इस्रायल या दोन देशांमध्ये चांगल्या संबंधांसाठी आरोग्यसेवा हे महत्त्वाचे क्षेत्र असणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

40 ते 50 सेकंदात चाचणीचा रिपोर्ट मिळणार
भारत आणि इस्रायल हे दोन देश तयार करत असलेली ही रॅपिड टेस्ट टेक्नॉलॉजी एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे फक्त एका मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. यासाठी ज्या व्यक्तीची चाचणी करायची आहे त्या व्यक्तीने एका नळीत फक्त तोंडाने फुंकर मारायची आहे. यामुळे 30-40-50 सेकंदात चाचणीचा रिपोर्ट मिळणार आहे अशी माहिती रॉन माल्का यांनी दिली आहे. संपूर्ण जगासाठी ही एक आनंदाची बातमी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच ही टेक्नॉलॉजी एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी वापरण्यात येणार आहे असंही माल्का यांनी सांगितलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!