पाटोदा

पाटोद्यातील बांगरवाडी फाट्याजवळ बसवर दगडफेक; चालक जखमी

पाटोदा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल


पाटोदा : तालुक्यातील बांगरवाडी फाट्याजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडफेक करून परळी आगाराच्या बसच्या काचा फोडल्या. ही घटना शनिवारी (दि.12) रात्री उशिरा घडली. या दगडफेकीत काच लागून चालकाच्या डोळ्याजवळ इजा झाली.
परळी आगाराची स्लीपरकोच बस (एमएच 09 एफएल 342) शनिवारी सायंकाळी बोरीवलीला जाण्यासाठी निघाली होती. रात्री 11.15 वाजता बस पाटोदा शहर ओलांडून पुढे निघाली असता असताना बांगरवाडी फाट्याजवळ चुंबळी फाट्याकडून एका दुचाकीवरून तिघे तरुण आले. बसजवळ येत त्यांनी दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत बसच्या समोरील काचा फुटल्या. तसेच, काचेचा तुकडा उडून लागल्याने बस चालक सचिन भारती यांच्या डोळ्याजवळ इजा झाली. मार लागल्याने भारती यांनी बस थांबवताच ते तिघे हल्लेखोर पाटोद्याच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी चालक सचिन इंद्रजीत भारती यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, त्या हल्लेखोरांनी बसवर दगडफेक का केली यामागचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पाटोदा पोलीस पुढील तपास करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!