अंबाजोगाई

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर अत्याचाऱअंबाजोगाई : केज तालुक्यातील तरुणाने अंबाजोगाई तालुक्यातील अल्पवयीन युवतीसोबत फेसबुकवर मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने युवतीने विषारी औषध प्राशन केले. याप्रकरणी बर्दापूर ठाण्यात त्या तरुणावर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला.
फारुख मुस्तफा शेख (रा. आडस, ता. केज) असे त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. तर, 17 वर्षीय अल्पवयीन पिडीता अंबाजोगाई तालुक्यातील असून ती सध्या बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात फेसबुकवर पिडीतेची आणि फारुखची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत फारुखने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिला दुचाकीवर बसवून परळीच्या जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर फारुखने लग्नास नकार दिल्याने पिडीतेने विषारी औषध प्राशन केले असे तिने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पिडीतेवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून फारुख मुस्तफा शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास फौजदार रविराज जमादार करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!