मुंबई

सुशांतच्या बहिणींविरोधात FIR दाखल, सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा रियाचा आरोप

FIR register against sushant singh rajput sisters priyanka meetu singh and doctor tarun kumar after rhea file complaint

मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आता आणखी एक नवं वळण पाहायला मिळत आहे. एनसीबीच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलीस स्ठानकात सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. रियाने तक्रार केल्यानंतर वांद्रे पोलीसांनी सुशांतच्या दोन बहिणी प्रियांका सिंह आणि मीतू सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही बहिणींवर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सुशांतच्या बहिणी आणि एक डॉक्टर तरुण कुमापच्या विरोधात रिया चक्रवर्तीने तक्रार दाखल केल्यानंतर 12 तासांच्या आतच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे पोलिस स्थानकात इंस्पेक्टर प्रमोद कुंभार यांनी सुशांतच्या दोन बहिणी आणि एका डॉक्टरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. डॉ. तरुण कुमार दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात कार्डियोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांच्यावर सुशांतला औषधं दिल्याचा आरोप आहे. या सर्वांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा, सुशांतची दिशाभूल केल्याचा आणि गुन्हेगारी षड्यंत्र रचल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!