Uncategorized

कधीपर्यंत संपणार कोरोना व्हायरस?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अस दिलं उत्तर!


नवी दिल्ली,दि.31: देशात आणि जगात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे विचित्र परिस्थिती उद्भवली आहे आणि यामुळे लोकांच्या मनात हाच प्रश्न पुन्हा पुन्हा उद्भवत आहे की, जग या प्राणघातक महामारीपासून कधी मुक्त होईल? भारतातही संसर्ग होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे आणि मृतांची संख्या दररोज वाढत आहे, यामुळे चिंता वाढत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी असं म्हटलं आहे की, दिवाळीपर्यंत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्गासंदर्भात देशात परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच त्यांनी केलेलं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज ७० हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत एकूण ३६ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी ६३ हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याचवेळी, जगभरात या प्राणघातक रोगाने ८.५० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच आतापर्यंत जगभरात २.५३ कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली .

आरोग्यमंत्री काय म्हणाले?
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आशा व्यक्त केली आहे की, य यावर्षी दिवाळीपर्यंत कोविड -१९ ची स्थिती नियंत्रणात येईल. ते एका ऑनलाईन सेमिनारमध्ये बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, ‘साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारत जगातील इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. आशा आहे की येत्या काही महिन्यांत बहुधा दिवाळीपर्यंत आम्ही कोरोना विषाणू संसर्गावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवू.’
डॉ. हर्षवर्धन पुढे असंही म्हणाले की, ‘देशातील कोविड-१९ चे रुग्ण सापडण्यापूर्वीच आरोग्य अधिकाऱ्यांनी याविषयी बैठक घेऊन त्यावर चर्चा केली होती. नंतर त्यांच्या नेतृत्वात समिती गठीत करण्यात आली. ज्यानंतर आतापर्यंत या समितीची २२ वेळा बैठक झाली आहे. आता देशात हजारोंच्या संख्येने प्रयोगशाळा आहेत आणि दररोज १० लाखांहून अधिक नमुने तपासले जात आहेत. आता पीपीई किट्स, व्हेंटिलेटर आणि एन-95 मास्कचीही कमतरता नाही.’ ते म्हणाले की संसर्ग रोखण्यासाठी लसीची चाचणीही जोरात सुरू असून वर्षाच्या अखेरीस ती यशस्वी होण्याची अपेक्षा आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!