Uncategorized माजलगाव

नवस फेडण्यासाठी 60 व्यापार्‍यांनी मोरेश्‍वराची केली पायी वारी


बीड : गोर-गरिबांसाठी दिवस-रात्र सेवा करताना जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांना कोरोनाची लागण झाली होती, या दोघांचीही कोरोनातून मुक्तता होवू दे, असे साकडे घालत माजलगावच्या व्यापार्‍यांनी मोरेश्‍वराला नवस बोलला होता, अखेर हा मोरेश्‍वर व्यापार्‍यांच्या नवसाला पावला आहे. कारण मागील काही दिवसांपुर्वीच संतोष सोहनी आणि विनोद पिंगळेंची कोरोनातून मुक्ताता झाली आहे, त्यामुळे रविवारी माजलगाव येथील संजय साळूंके आणि सुरेंद्र रेदासणी यांनी पन्नास व्यापार्‍यांचा जत्था सोबत घेत माजलगाव ते गंगामसला असे 20 किमीचे अंतर चालत जावून मोरेश्‍वराचा नवस पुर्ण केला आहे. यावेळी संतोष सोहनी आणि विनोद पिंगळेंच्या हस्ते मोरेश्‍वराचा अभिषेक आणि आरतीही करण्यात आली, तर याच ठिकाणी व्यापार्‍यांनी 200 जणांना अन्नदान केले आहे.
मॉ. वैष्णवी देवी पॅलेसचे सर्वेसर्वा तथा जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी हे नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कामात पुढे असतात, त्यांना या कामात बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे हे पावलोपावली खंबीरपणे साथ देतात, 2020 या वर्षात सर्वांनाच कोरोनाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या संकटाशी दोन हात करताना शासन आणि प्रशासनाने सातत्याने लॉकडाऊन केले, यामुळे बीड जिल्ह्यातील गोरगरिब जनतेपुढे मोठे संकट उभा राहिले, या अडचणीत अगदी पहिल्यापासूनच संतोष सोहनी अनेकांच्या मदतीसाठी धावून गेले, सुरूवातीच्या काळात त्यांनी गोर-गरिबांना डब्ब्यांच्या माध्यमातून थेट मदत केली, त्यानंतर किराणा वाटप केला, तर सध्या कोवीड सेंटरसाठी आपल्या मॉ वैष्णवी मंगल कार्यालयाची इमारत निशुल्क देवून ते कोरोना विरूध्दच्या लढाईत मोठे योगदान देत आहेत. दिवस-रात्र सेवेचे हे काम करत असताना मागच्या काही दिवसांपुर्वी संतोष सोहनी यांच्यासह त्यांना पावलोपावली खंबीरपणे साथ देणार्‍या विनोद पिंगळेंना कोरोनाची लागण झाली होती, ते कोरोनामुक्त व्हावेत यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती, विशेष म्हणजे माजलगावच्या व्यापार्‍यांनी तर मोरेश्‍वराला नवसच केला होता, नवसाला पावणारा गणपत्ती म्हणून मोरेश्‍वराची ओखळ आहे. त्यानुसार हा मोरेश्‍वर माजलगावच्या व्यापार्‍यांच्या नवसाला पावला आहे. कारण मागच्या काही दिवसांपुर्वीच संतोष सोहनी आणि विनोद पिंगळे हे कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे माजलगावचे संजय साळूंके आणि सुरेंद्र रेदासणी यांनी रविवारी 60 व्यापार्‍यांचा जत्था आपल्या सोबत घेत माजलगाव ते गंगामसला असे 20 किलो मीटरचे अंतर पायी चालून आपला नवस पुर्ण केला आहे. हे सर्व व्यापारी पहाटे पाच वाजता माजलगावमधून निघाले होते, सकाळी दहाच्या सुमारास ते मोरेश्‍वराच्या मंदिरात पोहचले. त्यानंतर याठिकाणी संतोष सोहनी आणि विनोद पिंगळेंच्या हस्ते मोरेश्‍वराचा अभिषेक आणि आरती करण्यात आली तसेच माजलगावच्या व्यापार्‍यांनी याच ठिकाणी तब्बल दोनशे जणांना अन्नदानही केले. दरम्यान माजलगाव व्यापारी बंधूंचे हे प्रेम आणि ऋण डोक्यावर आयुष्यभर राहील. आयुष्यात हे ऋण कमी करण्याचा प्रयत्न करेल अशा भावना सोहनी व पिंगळे यांनी व्यक्त केल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!