मुंबई

आंतरजिल्हा बस सुरुचा निर्णय; यादिवशीपासुन होणार सेवा सुरू

मुंबई : गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेली राज्य परिवहन मंडळाची आंतरजिल्हा बस सेवा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असुन आता उद्या दि.२० आगस्ट पासुन एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे.

कोरोना महामारीमुळे २२ मार्चपासून राज्यातील जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा बंद होती. सेवा बंद असतानाही परिवहन मंडळाच्याने राज्यात अडकलेल्या परप्रांतिय मजुरांना सिमेपर्यंत सोडणे, परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. यासोबतच परिवहन मंडळाने मालवाहतुकीचा पर्याय या काळात दिला. २६ जून नंतर जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु करण्यात आली. सुरुवातीला भेदरलेला प्रवासी वर्ग हळूहळू एसटीकडे वळत आहे. मागील साडेचार महिने बंद असलेली आंतरजिल्हा बससेवा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आज राज्य सरकारने आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील प्रवाशी वर्ग सुखावला असुन राज्याची स्थिती पुर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज नसली तरी प्रवाशांना काही नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!