बीड

पंकजाताईंचा 22 मार्चपासून बीड जिल्ह्यात झंझावात, मोहटा देवी, नारायण गड, गहिनीनाथगड, भगवान भक्ती गडावर जाऊन घेणार दर्शन


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : बीड लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे, ही निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ह्या ताकतीने मैदानात उतरल्या आहेत. त्याअनुषंगाने ताईंचा येत्या 22 मार्चपासून बीड जिल्ह्यात झंझावत पहायला मिळणार आहे. या दौर्‍याच्या निमित्ताने त्या दर्शनासाठी पाथर्डी येथील श्री. श्रेत्र मोहटा देवी तर जिल्ह्यातील नारायण गड, गहिनीनाथ गड आणि भगवान भक्ती गडावरही जाणार आहेत. याबरोबरच त्या या दौर्‍यात अनेकांच्या गाठीभेटीही घेणार आहेत.
बीड जिल्ह्याला पुढे घेवून जाण्याच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सातत्याने काम केलेले आहे. बीड जिल्ह्यात तर त्यांनी 25 हजार कोटींहून अधिक निधी खेचून आणत जिल्ह्यात विकासाची गंगाच आणलेली आहे, आता याच कामाची पावती म्हणून त्यांच्या पाठीशी संपूर्ण बीड जिल्हा उभा राहत असल्याचे पहायला मिळणार आहे. त्या स्वत: लोकसभेच्या निवडणूकीत उमेदवार आहेत.  याअनुषंगानेच त्यांनी आपल्या प्रचारालाही सुरवात केली आहे, 22 मार्च पासून त्या बीड जिल्ह्यात दौरा करणार आहेत. त्यानुसार 21 मार्च रोजी दुपारी एक वाजता मुंबई येथून कारने पुण्याकडे त्या रवाना होणार आहेत. सायंकाळी चार वाजता पुणे येथे अगमन, सायंकाळी साडे पाच वाजता पुणे येथून कारने अहिल्या नगरकडे रवाना, रात्री साडे आठ वाजता अहिल्या नगर येथे आगमन, 22 मार्च रोजी सकाळी आठ वाजता अहिल्यानगरहून पांगरमलकडे रवाना, पावणे नऊ वाजता पांगरमल येथे नारळी सप्ताहाच्या झेंडा पुजनास उपस्थिती, सव्वा नऊ वाजता पांगरमलहून श्री. श्रेत्र मोहटा देवी (ता.पाथर्डी) कडे रवाना, सकाळी साडे आकरा वाजता श्री श्रेत्र मोहटा देवी येथे आगमन व दर्शन, दुपारी 12,15 धामणगाव (ता.आष्टी) कडे रवाना, दुपारी एक वाजता धामणगाव येथे आगमन व बीडच्या जिल्ह्याच्या वतीने स्वागत, दुपारी दोन वाजता धामणगाव येथून कारने आष्टीकडे रवाना, दुपारी तीन वाजता आष्टी, पावणे पाच वाजता गहिनीनाथ गडाचे दर्शन, साडे पाच वाजता भगवान भक्ती गडावर जावून त्या दर्शन घेणार आहेत. रात्री आठ वाजता त्यांचे बीडमध्ये आगमन होणार आहे. तर 23 मार्च रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता नारायणगडावर जावून त्या दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पावणे बारा वाजता बीडमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी सव्वा बारा वाजता गेवराईत माजी आ. बदामराव पंडित यांच्या तर दुपारी सव्वा एक वाजता आ. लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट त्या देणार आहेत. त्यानंतर त्या बीडमध्ये परत येणार असून त्या दैनिकांना भेटी देणार आहेत. तर 24 मार्च रोजी दुपारी बारा वाजता त्या कौठळी तांडा (ता.परळी) येथे जावून बंजारा समाज बांधवांसोबत होळी साजरी करणार आहेत. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!