बीड

पाटोदा येथील गोळीबार प्रकरण, दोघांवरही होणार 307 चा गुन्हा दाखल, पोलिस अधीक्षकांनी दिले आदेश

बीड, पाटोद्या तालुक्यातील चीखली परिसरात रात्री उशिरा गोळीबार झाला आहे, आलम पुढारी यांनी स्वताच्या संरक्षणासाठी हा गोळीबार केला आहे, लग्नातील वाद रात्री उफाळून आला, यावेळी गाडे नावाच्या व्यक्तीने आलम पुढारी यांच्यावर आघात केला, त्यामुळे पुढारी यांनाही गोळीबार करावा लागला,
यामध्ये दोघे जखमी झाले आहेत, यापैकी एकाला गोळी लागली आहे, दरम्यान या घटनेची तातडीने दाखल घेत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दोघांवरही 307 चे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!