बीड

शालेय पोषण आहार कामगारांचे सव्वा दोन कोटी खात्यात, शासनाकडून आलेला निधी सीईओ अविनाश पाठकांनी तातडीने केला वितरीत


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : चालू महिण्यापासून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक वेळ (बुधवारी) अंडी किंवा केळी देण्यात येत आहे. त्यानुसार यासाठी आलेले 84 लाख आणि नोव्हेंबरचे मानधन असा एकूण दोन कोटी 16 लाख रूपयांचा निधी सीईओ अविनाश पाठक यांनी शाळा आणि शालेय पोषण आहार कामगारांच्या खात्यात वर्ग केला आहे. दरम्यान निधी तात्काळ वर्ग केल्यामुळे सीईओ अविनाश पाठक यांचे जिल्ह्यातील कामगारांमधून आभार मानले जात आहेत.
बीड जिल्ह्यातील 3193 शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार कामगारांच्या माध्यमातून पोषण आहार देण्याचे काम केले जात आहे. यासाठी बीड जिल्ह्यात पाच हजाराहून कामगार सेवा देत आहेत. विशेष म्हणजे या चालू महिण्यापासून आठवड्यातील बुधवारी विद्यार्थ्यांना केळी किंवा अंडीही दिली जात आहेत. यासाठी एका विद्यार्थ्याला पाच रूपयांचे अनुदान दिले जात आहेत. त्यानुसार केळी आणि अंडीसाठी आलेला 84 लाख रूपयांचा निधी सीईओ अविनाश पाठक यांनी तातडीने शाळांच्या खात्यात जमा केला आहे. त्याचबरोबर कामगारांचे नोव्हेंबर महिण्याच्या मानधनाचे 1 कोटी 32 लाख असा एकूण दोन कोटी 16 लाख रूपयांचा निधी मागच्या दोन दिवसांपुर्वी सीईओंनी वितरीत केला आहे. हा निधी वितरीत केल्याबद्दल सीईओ अविनाश पाठक यांचे कामगारांमधून आभार मानले जात आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!