बीड

आष्टीत तहसीलदारांच्या गाडीला रात्री लागली आग, पोलिस यंत्रणा घटनास्थळी, आगीचे कारण स्पष्ट नाही

————————— ——————- कडा / वार्ताहर —————– आष्टी येथील तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला मध्यरात्री अडीच वाजच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून, दरम्यान ही आग लागली कि लावली हा प्रश्न आहे. सध्या मराठा आरक्षण आंदोलन सुरु असल्यामुळे गावागावात आरक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरु आहे. मात्र काही ठिकाणी जाळपोळ च्या घटना घडत असतानाच, आष्टीचे तहसिलदार प्रमोद गायकवाड यांची गाडी पेटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, तहसीलदार गायकवाड यांनी त्वरीत पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांच्याशी संपर्क साधला. पोनि खेतमाळस यांनी लवाजम्यासह तातडीने घटनास्थळी भेट दिली. आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी अग्नीशामक दलाला पाचारण करुन वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी स्वत: प्रयत्न केले. अद्याप तहसीलदारांच्या वाहनाला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेचा पुढील तपास आष्टीचे पोलिस करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!