बीड

माजलगावात आंदोलकांनी आ. प्रकाश सोळुंके यांचा बंगला पेटवला; 4 वाहनांसह 10 दुचाकी पेटविल्या

माजलगाव : काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर माजलगावचे राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाजबांधव आक्रमक झाले. आ.सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक करण्यात आली.
सुरूवातीला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतू जमाव संतापलेला होता. काही तरूणांनी गेट तोडून घरात प्रवेश केला. घराच्या काचा फोडल्या. तसेच पार्किंगमधील तीन ते चार गाड्या आगोदर फोडल्या. त्यानंतर त्या पेटवून देण्यात आला. यामध्ये चार वाहनांसह 10 दुचाकी पेटवून देण्यात आले आहे. जवळपास हजारापेक्षा जास्त मराठा समाजबांधव घराभोवती जमले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाही अपुरा पडत होता. दुपारी १२ पर्यंत जमा आ.सोळंके यांच्या घराजवळवच होता. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांची अधिक कुमक बोलवण्यात आली होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!