आष्टी, दि.12 ब्रम्हगांव आणि आष्टी शहरालगत असलेल्या ओमगुरूदेव सोसायटी येथे एकाच राञी पाच घरफोड्या झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथिल पवार वस्ती येथिल शरद बबन पवार यांच्या घरात चोर शिरले व घरातील एक पेटी घेऊन पसार झाले. त्यानंतर ब्रम्हगांव बस स्टॅंड जवळ असलेल्या सुदाम शिंदे यांच्या घराकडे चोरांनी आपला मोर्चा वळवला तेथे चोर घरात शिरल्यानंतर घरातील लोक जागे झाले. चोरांनी त्यांना हत्याराचा धाक दाखवुन चोरी करण्याचा प्रयत्न केला माञ हे होत असतांना घरातील लहान मुले जागे झाले व मोठ्या रडु लागले त्यामुळे चोरांनी येथुन काढता पाय घेतला. आष्टी- ब्रम्हगांव रोडवर गोरख देशमुख यांची विटभट्टी आणि घर आहे. येथे चोरट्यांनी घराचे दार उघडून घरात प्रवेश केला. व गोरख देशमुख यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढुन घेतले. तसेच गोरख देशमुख यांना मारहाण करून त्यांच्या गळ्याला चाकु लावुन पैशाची मागणी केली. आम्ही रानच्या वस्तीवर राहतो त्यामुळे घरात पैसे ठेवत नसल्याचे सांगीतले परंतु चोरट्यांनी त्यांचे ऐकता घरातील कपाटाची उचला- पाचक करून घरातील रोख रक्कम चोरून नेहली. याच रस्त्यावर असलेल्या हजीपुर फाट्यावरील घुले वस्ती येथिल बाबासाहेब घुले यांच्या घराच्या दारात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातीने सोन्याची दागिने चोरट्यांनी लंपास केले. आष्टी शहराला लागुन असलेल्या आष्टी – जामखेड रोडवरील ओम गुरूदेव सोसायटीतील महिला पोलीस कर्मचार्यांचे घर उघडून घरातील साहित्याची उचका- पाचक केली. या पाचही घरफोडीच्या घटना राञी दिड ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडल्याचे बोलले जात आहे. सदरील घरफोट्यांचा प्रवास मुगगांव- ब्रम्हगांव- आष्टी या रस्त्यावरून श्रृंगेरी देवीच्या पायथ्याशी असलेल्या पवार वस्तीपासुन सुरू झाला तो आष्टी शहरालगत असलेल्या जामखेड रोडवरील ओम गुरुदेव सोसायटीत संपला. या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घरफोड्यांमध्ये किती ऐवज लंपास झाला ते पोलीस तपासानंतरच उघड होईल. या घटनेचा तपास आष्टी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी करत आहेत.