बीड

इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील हा यात्रोत्सव रद्द


श्रावणी सोमवारनिमित्त देखील शुकशुकाट

पाटोदा, दि.10 (लोकाशा न्यूज) ः महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर दरी याठिकाणी श्रावणामधील तिसर्‍या सोमवारी मोठी यात्रा भरते. हि यात्रा इतिहासात प्रथमच कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे.
ाटोदा तालुक्यातील सौताडा येथे खोल दरीमध्ये कोसळणारा धबधबा. दरी मधील रामेश्वराचे मंदिर व निसर्रम्य परिसर या मुळे सौताडा रामेश्वर हे भाविक व पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे ,असे सांगितले जाते की , वनवासाच्या काळात भगवान श्रीरामांनी याठिकाणी वास्तव्य करून या ठिकाणी स्थान केले आणि सितेसह या ठिकाणी केस विंचरले म्हणून या नदीला विंचरणा नदी म्हणतात अशी अख्यायिका सांगितले जाते. रामाचे मंदिर आणि शंकराची पिंड यामुळे क्षेत्राला रामेश्वर म्हटले जाते याच रामेश्वर दरी मध्ये दरवर्षी श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारी यात्रा भरते .या दिवशीचे खास आकर्षण म्हणजे दुपारच्या सुमारास देवाच्या घोड्याची गावातून मिरवणूक काढली जाते व त्या घोड्याला खाली दरीमध्ये नेऊन त्याठिकाणी त्याची पूजा करण्यात येते. उंचीवरून पडणारा धबधबा नैसर्गीक वरदान लाभलेल्या रामेश्वर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहे. परिसरात पावसाने हिवीगार झालेले वनराई विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले, आणि स्वतःदरीमध्ये झोकुन देणारे झरे असे निसर्गाचे खरेखुरे रूप येथे पहायला मिळते त्यामुळे परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती.. पण या वर्षी कोरोनाचा महा मारी मुळे सौताडा गावकरी व प्रशासन यांनी मिळून यात्रा बंद ठेवण्यात आली होती .फक्त पारंपरिक पूजा पुजारी यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!