केज, दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 9.15 वाजता केज पोलीस स्टेशन हद्दीत, खुरेशी मोहल्ला, दर्गा रोड, केज येथे गोडाउन वर छापा टाकला असता,702,860 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला.
म्हणून आरोपी नामे अबुजर खैरउमिया खुरेशी हा प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध भा द वि 272, 273, 328 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या पथकाचे एपीआय विलास हजारे यांनी केली आहे.