माजलगाव

दहा लाखासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या लोकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

-माजलगाव, ता. २७ (लोकाशा न्यूज) : प्लॉट घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळीने विवाहितेचा छळ केला. विवाहितेच्या फिर्यादीवरून नवरा, सासू, सासरे यांच्यासह सासरच्या नऊ जणाविरुद्ध शुक्रवारी (ता. २७) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील तलत बेगम सय्यद अमेर (रा. नवी आबादी, चांदणी ग्राउंड माजलगाव) यांचे सय्यद अमेर सय्यद अहमद (रा. रहमत नगर, परभणी) यांच्यासोबत जुलै २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नंतर दोन, तीन महिने चांगले नांदवल्यानंतर प्लॉट खरेदीसाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणत सासरच्या मंडळीने तलत बेगम यांचा शाररीक, मानसिक छळ सुरु केला. त्यावेळी घरगुती अडचणीमुळे त्यांनी एक लाख रुपये माहेरहून मागवून घेतली. त्यानंतर सासरची मंडळी सय्यद अमेर सय्यद अहमद, (नवरा) सय्यद अहमद (सासरा) अस्मा कौसर (सासू), अफरीम बेगम शेख सत्तार (नणंद), समरिम बेगम सय्यद कलीम (नणंद), सय्यद आवेस सय्यद अहमद (दीर) सय्यद सोहेल सय्यद अहमद (दीर), सय्यद जुनेद अहमद (दीर), सय्यद सोहेब (दीर) सर्व राहणार रहमत नगर परभणी यांनी विवाहितेचा शाररीक, मानसिक छळ सुरु करून मारहाण सुरु केली. दहा लाख रुपये आणल्याशिवाय घरात येऊ नको असे म्हणत घरातून हाकलून दिले. याबाबत विवाहितेने महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली होती. ता. २८ जुलै रोजी सासरची मंडळीने माजलगावला येऊन तुम्ही आमच्या विरोधात तक्रार का दिली म्हणत आई, वडील, भाऊ आदी माहेरच्या लोकांना मारहाण, शिवीगाळ करून जीवेमारण्याची धमकी दिली. यावरून विवाहिता तलत बेगम यांच्या फिर्यादीवरून वरील सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!