परळी

पंकजाताई मुंडेंच्या वाढदिवशी परळीत दीपोत्सव ! वैद्यनाथ मंदिर परिसरात हजारो पणत्या उजळल्या ; ‘एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ’ कार्यकर्त्यांचा उपक्रम

परळी । दिनांक २७।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस सोमवारी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला. ‘एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ ‘ उपक्रमांतर्गत महिलांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात पणत्या प्रज्वलित करून वाढदिवस साजरा केला. हजारो पणत्यांनी मंदिर परिसर उजळून गेल्याने जणू दीपोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाढदिवस साजरा करत असताना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी न करता “एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ” हा उपक्रम राबवला. पंकजाताईंनी तसे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. यालाच प्रतिसाद देत परळीत प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात महिलांनी पणत्या लावून दीपोत्सव केला. आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना दीर्घायुष्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
परळीत या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. कोकणात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर येऊन तिथल्या नागरिकांना जगण्याची नवी उमेद मिळावी, कोरोना महामारी लवकर संपून जनजीवन पूर्वपदावर यावे अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली. प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात असंख्य पणत्या लावल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!