परळी

मुलीच्या विरहाने बापाची गळफास घेऊन आत्महत्या,सिरसाळा येथील घटना

 

सिरसाळा न्यूज : मुलीच्या विरहाने बापाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिरसाळा येथे घडली आहे.
शेख रतन शेख नुरमुहम्मद वय ४२ रा. सिरसाळा ता.परळी वै. असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी शासकिय दवाखाना अंबाजोगाई येथे पाठवले, त्या ठिकाणी शवविच्छेदन झाले पंरतु नातेवाईकांनी शवविच्छेदन झालेले प्रेत ताब्यात घेतले नाही.
रतन यांच्या मृत्यूस पोलिस प्रशासन जबाबदार आहे, मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा आणि लवकरात लवकर पळवून नेलेल्या मुलीचा शोध घ्यावा अशी मागणी घेऊन संतप्त नातेवाईक सिरसाळा पोलिस स्टेशन येथे बसले आहेत.दरम्यान काळात सिरसाळा येथे तणाव ग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

 ● हे आहे प्रकरण  : रतन शेख यांच्या मुलीस ८ एप्रील रोजी एकाने पळवून नेले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. प्रथम ह्या प्रकरणी तपास पोलिस उपनिरीक्षक जनक पुरी यांच्या कडे होता पंरतु त्यांची सेवानिवृत्त झाली यामुळे हा तपास इतर  पोलिस उपनिरीक्षक अधिकारी  यांच्याकडे गेला. घटना घडल्या पासुन मुलीचे वडिल रतन शेख व नातेवाईक तपास कुठपर्यंत आला हे विचारण्यासाठी सतत पोलिस स्टेशन ला जात असत, तीन महिने झाले तरी मुलीचा तपास न लागल्याने मुलीच्या विरहाने  तणाव ग्रस्त परिस्थिती रतन शेख यांनी  रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी म्हटंले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!