राजकारण

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, महाराष्ट्रातून ४ जणांना मंत्रिपदाची लॉटरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर भारती पवार यांनाही केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. तर आणखी महाराष्ट्रातून कपिल पाटील, भागवतराव कराड यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. तर नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांचं नाव देखील चर्चेत आहे. नारायण राणे यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात सतत शिवसेनेला टिकेच्या धारेवर ठेवणारे नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. तर महाराष्ट्रातून २ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यात रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नवीन मंत्रिमंडळात 25 राज्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. संतोष गंगवार, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, रतनलाल कटारिया, थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देखील राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी ९ मंत्र्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.संभाव्य मंत्र्यांमध्ये 13 वकील, 5 अभियंते असू शकतात. मंत्र्यांमध्ये 5 डॉक्टर देखील आहेत. संभाव्य मंत्र्यांमध्ये 4 माजी मुख्यमंत्र्यांची नावेसुद्धा समाविष्ट आहेत. संभाव्य मंत्र्यांमध्ये 5 अभियंते देखील आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!