केज

केजमध्ये गॅस लिकेज होऊन घराला आग , सासू सुनासह मुलगी जखमी

केज दि .28 – तालुक्यातील सोने सांगवी येथे एका घरातील गॅस लिकेज झाल्याने घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून सासू सुनासह एक मुलगी जखमी झाली आहे . सोने सांगवी येथे दि .29 रोजी सकाळी अंदाजे दहा ते अकरा च्या दरम्यान विष्णू बाजीराव कणसे यांच्या घरातील गॅस सिलेंडर मधून गॅस गळती होऊन पेट घेतला . सदरील प्रकार घडल्याने घरातील विष्णू कणसे यांच्या पत्नीने व सूनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही . तर यामध्ये त्या दोघींसह एक मुलगी जखमी झाल्याने तिघीनाही उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . दरम्यान सदरील प्रकार नेमका कसा घडला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . मात्र सदरील घटनेत नगदी रकमेसह घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे . घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असून संबंधित तलाठी व मंडलाधिकारी हे घटनास्थळी रवाना झाले आहेत .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!