बीड

अखेर खरीपाच्या तोंडावर नरेंद्र मोदींनी शेतकर्‍यांना तारले, खा. प्रीतमताईंची मागणी पंतप्रधानांनी केली मान्य, डीएपी खतांच्या वाढलेल्या किंमती केल्या कमी, आता डीएपी खताची एक गोणी 2400 ऐवजी 1200 रूपयांना मिळणार


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : अचाणक खताच्या किंमती वाढल्यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशातील शेतकरी अडचणीत सापडला होता. बुधवारी यासंदर्भात खा. प्रीतमताई मुंडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय रासायन व खते मंत्र्यांना पत्र पाठविले होते, खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राव्दारे केली होती, त्यांच्या या मागणीची मोदींनी दखल घेवून खतांचे दर कमी केले आहेत. डीएपीचा खताची एक बॅग 2400 ऐवजी 1200 रूपयांचा मिळणार असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ताईंच्या एका मागणीने कोट्यावधी शेतकर्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून त्यांचे आभार मानले जात आहेत.
खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये केलेल्या अत्याधिक दरवाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. महामारीच्या संकटात अन्नदात्या बळीराजावर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी मंगळवारी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांच्या किंमतींमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना खतांच्या किंमतीमध्ये झालेली दरवाढ आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. शिवाय खरीप हंगाम देखील नजीक आला असल्याने पेरणीपूर्वी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी होणे आवश्यक असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रसायन व खते मंत्र्यांना म्हटले होते. त्यांच्या या मागणीची पंतप्रधानांनी तात्काळ दखल घेतली आहे. डीएपी खताची एक बॅग 2400 ऐवजी आता 1200 रूपयांच मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहिर केले आहे. खा. प्रीतमताईंनी केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांचा प्रश्‍न सोडवून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले जात आहेत. खत अनुदानाच्या दरवाढीचा ऐतिहासिक शेतकरी समर्थक निर्णय घेण्यात आला आहे. डीएपी खतवर सबसिडी 1 %0% वाढविण्यात आली, डीएपीच्या प्रत्येक बॅगला 500 रुपयांऐवजी 1200 रुपये अनुदान मिळणार आहे. 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना डीएपीची बॅग शेतकर्‍यांना मिळणार आहे. या अनुदानासाठी सरकार 14,775 कोटी रुपये खर्च करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली खत दराच्या प्रश्नावर उच्चस्तरीय बैठक झाली. त्यांना खतांच्या दराच्या मुद्द्यावर सविस्तर सादरीकरण देण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक रलळवसिड, अमोनिया इत्यादींच्या वाढत्या किंमतींमुळे खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याची चर्चा होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती असूनही शेतक ेश्रव्यांना जुन्या दराने खत मिळाला पाहिजे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. डीएपी खतासाठी अनुदान ठी00 रुपयांवरून वाढवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!