बीड

अखेर राम, लक्ष्मणाचा मारेकरी परमेश्वर ‘ , भुतेकरांनी केला गजाआड, आरोपी परमेश्वर नागापुर मधील एका पडक्या घरात बसला होता लपुन


बीड, दि. 19 : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादातून कुहाडीने घाव घालत दोन भावांची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना नागपूर ( खु . ) येथे सोमवारी रात्री 11 वाजता घडली होती.या प्रकरणातील आरोपी परमेश्वर साळूके यास तीस तासाच्या आत जेरबंद करण्यात एपीआय शरद भूतेकर यांना यश मिळाले आहे . 15 दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुके याने राम साळके ( 50 ) व लक्ष्मण साळुके ( 47 ) या दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती . तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता ; परंतु सोमवाटी परमेश्वरने या दोघांना फोनवरून शिवीगाळ केली . याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळंके गेले होते . यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कुहाडीचे घाव घालून निघृण खून करण्यात आला . या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके , सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती . या प्रकरणी परमेश्वर साळुकेविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता . पिंपळनेर पोलिस ठाण्याचे एपीआय शरद भुतेकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत घटनेच्या तीस तासाच्या आत आरोपीस पकडण्यात यश मिळवले .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!