बीड

खरीपाच्या तोंडावर मोदी शेतकर्‍यांना पावणार, 14 मे ला पीएम किसानचा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर येणार


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामाच्या तोंडावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांना पावणार आहेत. कारण 14 मे रोजी त्यांच्या आदेशाने पीएम किसानचा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार पीएम किसान या योजनेतून शेतकर्‍यांना दर वर्षी दोन दोन हजार रूपयांचे तीन हप्ते त्यांच्या खात्यावर वर्ग करत आहेत. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना या तीन हप्त्यामुळे मोठा आधार मिळत आहे. शेतकर्‍यांची गरज लक्षात घेवून पीएम किसानचा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केला जातो, यामुळे शेतकर्‍यांचे छोटी मोठी कामे मार्गी लागत आहेत. यंदाचा खरीप हंगामही तोंडावर आला आहे, तोंडावर आलेला हाच हंगाम लक्षात घेवून 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने पीएम किसानचा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. याअनुषंगानेच 14 मे रोजी नरेंद्र मोदी स्वत: देशातील शेतकर्‍यांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान 14 मे रोजी पडणार्‍या या हप्त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा आधार मिळणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!