पाटोदा

बीड जिल्ह्याचा दिल्लीत डंका

राहुल आवारेंना अर्जुनवीर पुरस्कार जाहीर,पाटोद्यात दिवाळी


पाटोदा : महाराष्ट्राचा लाडका मल्ल,बीड जिल्ह्यातील पाटोदा गावाचा सुपूत्र, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे वस्तादचा मल्ल,रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार,काकासाहेब पवार यांचा शिष्य, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता,जागतिक कांस्यपदक विजेता, तसेच भामेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी डीवाय.एस.पी. पै.राहुल बाळासाहेब आवारे याला केंद्र सरकारचा क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. राहूलच्या या यशामुळे बीड जिल्ह्याचा डंका दिल्लीत कायम असल्याचे पहायला मिळत आहे.
गतवर्षी गुण पूर्ण असुनही राहुल या सन्मानापासून वंचित होता. यावर्षी मात्र राहुलच्या उण्यापुर्‍या 15 वर्षाच्या कारकिर्दीला न्याय मिळाला. अन्यायाची अखंड मालिका राहुलने केवळ गुरूंच्या संस्काराच्या आधारावर पचवली. नित्य नियमित आपल्या ध्येयाची पूजा करत राहुल एक नव्हे,दोन नव्हे अखंड 15 वर्षे कुस्ती क्षेत्रात गरुडभरारी मारत राहिला. राष्ट्रकुल सारख्या,जागतिक कुस्ती स्पर्धेसारख्या मानाच्या स्पर्धेत राहुलने पदक जिंकले. डीवायएसपी प्रशिक्षण घेत असलेला राहुल आवारे यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरला ही तमाम महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच भामेश्वर विद्यालयासाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे. त्यामुळे भामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव एल.आर. अ‍ॅड प्रकाशदादा कवठेकर, दिपकदादा घुमरे, आनंद जाधव, माऊली जरागे, बळीराम पोटे, गणेश नारायणकर यांनी राहुलचे विशेष अभिनंदन केले आहे. वास्तविक पाहता लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या राहूल आवरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. यापुर्वीही पंकजाताईंनी राहूल आवरेंना पावलोपावली मदत केलेली आहे आणि याही पुढे करणार आहेत. दरम्यान राहूलच्या या यशाबद्दल आ. सुरेश धसांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

/

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!