बीड, दि. 4 : जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी साहेबराव थोरवे यांचे वयाच्या १२० व्या वर्षी निधन झाले. आज सोलापूरवाडी ता.आष्टी येथे खा. प्रीतमताईंनी अंत्यविधीस उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय आणि विशेषतः अध्यात्मिक क्षेत्रात साहेबराव दादांनी मोठे योगदान दिले.आज त्यांची प्राणज्योत शरीर त्यागून गेली,शरीर नश्वर झाले, तरीही त्यांच्या कर्तृत्वाचा लौकिक अमर राहील,
थोरवे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यास शक्ती मिळो, असे यावेळी प्रीतमताई म्हणाल्या.