राजकारण

बेल की जेल? उद्या सुनावणी:सिंधुदुर्ग कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला; नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर उद्या पुन्हा सुनावणी

भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सिंधुदुर्ग सत्र न्यायालय सुनावणी होणार आहे. आजचा युक्तिवाद संपला असून उद्या या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना अटक होणार की नाही यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्गातील कणकवली पोलिसांकडून नोटीस बजावली. पोलिस स्टेशनला हजर राहण्यास या नोटीसमध्ये सांगण्यात आले. आमदार नितेश राणे हे नॉट रिचेबल असताना पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली. दरम्यान, पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी नितेश राणे कुठे आहे हे मला माहिती असुन देखील मी सांगणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यावरुनच पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावली आहे. नारायण राणेंना हजेरीसाठी दुपारी 3 वाजता वेळ देण्यात आली होती. परंतु, नारायण राणे हजर झाले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी तीच नोटीस राणेंच्या घरावर चिकटवली. याच्या काही मिनिटांतच राणेंच्या घरातील कर्मचाऱ्यांनी ती काढून टाकली.

नेमके काय आहे प्रकरण?
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.

अटकपूर्व जामिनावर सुनावणी
नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला. यावर काल न्यायालयात जवळपास तीन तास सुनावणी झाली. न्यायालयाकडून त्यांना तातडीने कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने तो वाढवून देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेतली आहे. सध्या ही सुनावणी सुरू आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!