परळी

गोविंदच्या कुटूंबियांना त्याच्या नसण्याची उणीव भासू देणार नाही,पंकजाताई मुंडे यांनी कुटुंबाला दिला धीर ; मुलांच्या शिक्षणाचीही घेतली जबाबदारी

परळी । दिनांक २२।
गोविंद, माझ्या परिवाराचाच सदस्य होता, त्याच्या नसण्याची उणीव तुम्हाला भासू देणार नाही. त्याच्या मुलांचे शिक्षण पुर्ण होऊन ते स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत जबाबदारी माझी आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आज गोविंदच्या कुटूंबियांचे सांत्वन करून धीर दिला.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा खासगी अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे काल रात्री लातूर येथे रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आज सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंकजाताई मुंडे हया आज तातडीने मुंबईहून निघून संध्याकाळी थेट त्यांच्या कन्हेरवाडी येथील निवासस्थानी पोहोचल्या व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन करून धीर दिला. गोविंदचे आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ अशा सर्वांच्या डोळ्यातील अश्रू त्यांनी पुसले. गोविंदच्या घरच्यांना त्याच्या नसण्याची उणीव भासू देणार नाही.तीनही मुलांना शिकून सवरून मोठं करून स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत माझी जबाबदारी असेल अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. गोविंदच्या जाण्याचे दुःख मलाही खूप झाले आहे असे त्या म्हणाल्या.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!