बीड

बीड तहसीलदारांच्या गाडीला वाळू टॅक्टरची धडक

ढेकणमोहा येथील घटना; दोन टॅक्टर ताब्यात


बीड, दि.6 (लोकाशा न्युज) ः
शासकीय मालमत्ता बापाची संपत्ती समजून वाळूमाफिया सर्रास अवैध वाळू उपसा करत आहे. स्थानिकांच्या जोरावर त्यंाची दादागिरी वाढतच चालली आहे. मंगळवारी दि.6 एप्रिल रोजी बीडचे तहसीलदार शिरिष वमने ढेकणमोहा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन टॅक्टर पकडण्यासाठी गेले असता यातील एका टॅक्टरचालकांनी थेट तहसीलदारांच्या गाडीवर टॅक्टर घातले. यात तहसीलदारांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तहसीलदारांना तीन पैकी दोन टॅक्टर पकडण्यात यश आले असून त्यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील कारवाई तहसीलदार शिरिष वमने, तलाठी तांदळे, तलाठी आंधळे, तलाठी नागरगोजे, ढेकणमोहा सज्जाचे तलाठी भोपालकर आदींनी केली.

ढेकणमोहा येथे कारवाई करण्यात आलेले टॅक्टर

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!