बीड, – बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबी येथे काल अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील सोने-चांदीचे २ लाख ६६ हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश बाबासाहेब माने (रा. मुरबा ता. अंबाजोगाई) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील सोने-चांदीचे दागिने यामध्ये सोन्याच्या पाटल्या तीन तोळ्याच्या, साडेतीन तोळ्याचे एक गंठन, सोन्याच्या चार अंगठ्या, चांदीची चैन, जोडवे असा एकूण २ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सतीश माने यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठार्यात कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जमादार हे करत आहेत.