देश विदेश

स्थानिक विकास निधीसाठी केंद्र सरकारने परवानगी दयावी ; खा.प्रितमताई मुंडे यांची लोकसभेत मागणी

दिल्ली.दि.१३—–कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसद सदस्यांचा स्थानिक विकास निधी आरोग्य व इतर यंत्रणांसाठी वळवण्यात आल्यामुळे मतदारसंघातील पायाभूत सुविधा आणि विकास कामांच्या निर्माणाला खीळ बसली आहे.प्राथमिक सुविधा आणि विकास कामांच्या समस्या सोडविण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्थानिक विकास निधी खर्च करण्यास परवानगी दयावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली आहे.

लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान लोकहिताचा मुद्दा उपस्थित करताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि ‘संसद सदस्यांचा स्थानिक विकास निधी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी वापरण्याचा अतिशय चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे,या निर्णयामुळे महामारी विरुद्धच्या लढ्यात योगदान देता आले याचे समाधान आहे.महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आता पूर्वपदावर येत असल्यामुळे निवडणूक क्षेत्रातील मतदारांच्या अपेक्षा आणि विश्वास सार्थ ठरवण्यासाठी स्थानिक विकास निधीचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे.केंद्र सरकारने या निर्णयावर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

संसद सदस्यांमधून होणाऱ्या एकमुखी मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेताना खा.प्रितमताई मुंडे यांनी याविषयी विस्तृत विचार व्यक्त केले.’लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक क्षेत्रातील जनतेसमोर जाताना त्यांच्या समस्या आणि विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची जवाबदारी आमची आहे.त्यामुळे टप्प्याटप्प्याने स्थानिक विकास निधीतील थोडाफार निधी खर्च करण्यास सरकारने परवानगी दयावी,जेणेकरून मतदारसंघात विकासाची कामे करता येतील असे मत व्यक्त केले.खासदार प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या मागणीला सभागृहात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांनी सहमती दर्शवून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!